Bhosari Crime News : उसने दिलेले पैसे मागितल्याने नातवाने फोडले आजोबांचे डोके

एमपीसी न्यूज – मुलाला उसने दिलेले पैसे परत मागितले. या कारणावरून नातवाने आजोबांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कठीण वस्तू डोक्यात मारून आजोबांचे डोके फोडले. ही घटना बुधवारी (दि. 22) रात्री महात्मा फुले नगर, एमआयडीसी भोसरी येथे घडली.

माणिकराव नरसिंगराव कळसे (वय 76, रा. महात्मा फुले नगर, एमआयडीसी भोसरी) असे जखमी आजोबांचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल गोविंद कळसे असे गुन्हा दाखल झालेल्या नातवाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माणिकराव यांनी त्यांचा मोठा मुलगा गोविंद याला उसने पैसे दिले होते. ते पैसे माणिकराव यांनी गोविंदला परत मागितले. या कारणावरून नातू अमोल याने माणिकराव यांना वाईट शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर अमोल याने आजोबा माणिकराव यांच्या डोक्यात लोखंडी कठीण वस्तूने मारले. या घटनेत आजोबा माणिकराव यांच्या डोक्यास मार लागल्याने ते जखमी झाले. एमआयडीसी भोसरी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.