Nigdi Crime News : इथे काम करायचे असेल तर चार लाख रुपये खंडणी द्यावी लागेल; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – इथे काम करायचे असेल तर चार लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी देत कामाची साईट बंद पाडली. ही घटना 5 मार्च ते 13 मे या कालावधीत पंचतारानगर आकुर्डी येथे घडली.

विशाल अमृत सोनवणे (रा. पंचतारानगर, आकुर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अनिल बाबुराव पवार (वय 43, रा. रामदास नगर, चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचतारा नगर आकुर्डी येथे फिर्यादी यांची कामाची साईट सुरु आहे. फिर्यादी, त्यांचा सुपरवायझर निखील हरिभाऊ डोंगरे, मित्र नितीश मधुकर कांबळे, कामगार यांना आरोपीने शिवीगाळ व दमदाटी केली. ‘तुला इथे काम करायचे असेल तर चार लाख रुपये खंडणी द्यावी लागेल. जर पैसे दिले नाहीत तर फिर्यादीस जीवे ठार मारण्याची धमकी आरोपीने दिली. तसेच फिर्यादी यांची कामाची साईट बंद पाडली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.