Chakan Crime News : पूर्ववैमनस्यातून तरुणाला रॉडने मारहाण; जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाने तरुणाला लोखंडी रॉडने मारून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच मोबाईल जमिनीवर आपटून नुकसान केले. ही घटना रविवारी (दि. 10) खेड तालुक्यातील मोहितेवाडी येथे ट्रान्सपोर्ट ऑफिससमोर घडली.

अभिषेक बाळासाहेब थिटे (वय 27, रा. थिटे आळी, केंदूर, ता. शिरूर, पुणे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय सयाजी जाधव (रा. गोकुळवाडी, चिंचोशी, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिषेक आणि आरोपी अक्षय यांचे मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून अक्षय याने त्याच्या गाडीतील लोखंडी रॉडने फिर्यादी अभिषेक यांना तोंडावर, पाठीवर, हातावर, मानेवर मारून जखमी केले. अभिषेक यांचा मोबाईल फोन जमिनीवर आपटून नुकसान केले तसेच शिवीगाळ करून अभिषेक यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.