Wakad : एक लाख पौंड खात्यावर जमा करण्याच्या बहाण्याने एकाची 34 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – सोशल मीडियावर ओळख करून विदेशात असल्याचे भासवले. विदेशातून भारतात येत असून एक लाख पौंड बँक खात्यात जमा करत असल्याचे सांगून थेरगाव येथील व्यक्तीकडून विविध खात्यांवर 34 लाख एक हजार 459 रुपये पाठवण्यास सांगून फसवणूक केली. हा प्रकार 7 ते 25 नोव्हेंबर 2019 या कालावधीत थेरगाव येथे घडली.

दत्तात्रय माधव शिंदे (वय 58, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 7088215230 क्रमांक धारक महिला नेहा शर्मा (रा. गुरगाव), निखिल शर्मा (पूर्ण नए पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉली नान्सी या महिलेने 447510107011 या क्रमांकावरून फिर्यादी दत्तात्रय यांच्याशी फेसबुकवर मैत्री केली. हॉली नान्सी या महिलेने ती भारतात येत असून तिने एक लाख पौंड सोबत आणले आहेत. ते पैसे दत्तात्रय यांच्या खात्यावर पाठवायचे आहेत. संगीता शर्मा या महिलेने कस्टमर ऑफिसर असल्याचे भासवून हॉली नान्सी या महिलेशी संगनमत करून एक लाख पौंड दत्तात्रय यांच्या खात्यात जमा होण्यासाठी वेगवेगळ्या कारणांसाठी 34 लाख एक हजार 459 रुपये भरण्यास सांगितले. दत्तात्रय यांनी विविध खात्यांवर पैसे जमा केले. पैसे जमा करून एक लाख पौंड जमा न करता तसेच जमा केलेले पैसे न देता फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.