Chikhali News : घरकुल येथे इमारतीवरून उडी मारून एकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – चिखली परिसरातील घरकुल येथे एका व्यक्तीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना आज सोमवारी (दि. 21) सकाळी घडली.

रोहिदास रावजी पिंगळे (रा. बी आठ, घरकुल, चिखली) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रोहिदास पिंगळे हे घरकुल मधील बी 8 या इमारतीत राहतात. त्यांनी ए 16 मातृछाया बिल्डींग वरून उडी मारून आज सकाळी आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.