Lonavala Corona Update: लोणावळा नगरपरिषदेत कोरोनाचा शिरकाव

one corona patient found in Lonavala Municipal Council पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एक जण लोणावळा नगरपरिषदेत कर्मचारी असून त्या भांगरवाडी भागात रहातात. तर दुसरी व्यक्ती ही ज्येष्ठ नागरिक असून मळवली परिसरात राहते.

0

एमपीसी न्यूज- लोणावळा नगरपरिषदेतील एक महिला कर्मचारी आज (दि.31) कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. इतके दिवस शहरात हातपाय पसरत असलेल्या कोरोनाने आता लोणावळा नगरपरिषदेत शिरकाव केला आहे. लोणावळा कोविड केअर सेंटर मधील पाच अहवाल आज सकाळी प्राप्त झाले. त्यापैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह व तीन अहवाल निगेटिव्ह आले.

पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एक जण लोणावळा नगरपरिषदेत कर्मचारी असून त्या भांगरवाडी भागात रहातात. तर दुसरी व्यक्ती ही ज्येष्ठ नागरिक असून मळवली परिसरात राहते.

लोणावळा शहरात आज अखेर 63 रुग्ण कोरोना बाधित सापडले आहेत. त्यापैकी 30 जण बरे झाले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. यासह 29 सक्रिय रुग्ण आहेत. आज लोणावळा कोविड सेंटरमधून 41 जणांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यांचे अहवाल आज सायंकाळी अथवा उद्या सकाळी प्राप्त होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like