केंद्रीय मंत्री जावडेकरांच्या खासदार निधीतून एक कोटीची मदत

पुणे – कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासदार निधीतून एक कोटी रुपयांचा निधी खासदार जावडेकर यांनी उपलब्ध करुन दिला आहे.

हा निधी पुण्यातील रुग्णांवरील उपचारांसाठी खर्च करण्यात यावा असे जावडेकर यांनी सुचविले असून, त्यातून विविध प्रकारची वैद्यकीय उपकरणे खरेदी केली जाणार आहेत. पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.

या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी खासदार निधीतून एक कोटी देणार असल्याचे जाहीर केले. त्यासंबंधीचे पत्र पुणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. कोविड १९ कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी हा निधी मंजूर केला आहे. यापूर्वी खासदार गिरीश बापट यांनीही 50 लाख रुपये निधी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.