Lonavala : गुरव समाजाचे एक दिवसीय धरणे आंदोलन

एमपीसी न्यूज – गुरव समाजाच्या विविध मागण्यांकरिता अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्या एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. गुरव समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला गुरव समाजाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव शिर्के, जिल्हा पालक संतोष वाघमारे देवस्थान समिती प्रमुख धनंजय दरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण राजगुरू यासह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

इनाम वर्ग 3 खालसा करणे, बेकायदा हस्तांतरण रद्द करून जमिनी मूळ सनद धारकास परत देणे, बेकायदेशीर कूळ काढणे, सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पन्नास टक्के विश्वस्त घेणे, उत्पन्नाचा परंपरागत हक्क कायम ठेवणे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृहासाठी जागा निधी उपलब्ध करून देणे, साठ वयापेक्षा जास्त वयाच्या पुजाऱ्यांना निवृत्ती वेतन देणे, मंदिराचे राजकीय बाजारीकरण रोखणे, ओबीसीचा जातीय निधी वाटप होणे, गुरव समाजाच्या संरक्षणासाठी अॅट्रॉसिटी ऍक्ट लागू करणे या मागण्याकरिता सदरचे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ओबीसी समाजाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव शिर्के यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.