Pune : यशदामध्ये सेवोत्तम या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद

एमपीसी न्यूज : केंद्र शासनाच्या प्रशासनिक सुधार आणि लोक तक्रार निवारण विभागामार्फत विविध राज्यांनी केंद्रिय तक्रार निवारण प्रणाली (CPGRAMS) व्दारे निकाली काढलेल्या नागरिकांच्या तक्रारींचे मूल्यमापन करुन राज्यांना त्यानुसार गुणांकन देण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असून तो लवकरच अंमलात आणण्यात येईल, असे  व्ही. श्रीनिवास, सचिव, DARPG यांनी यशदा, पुणे (Pune) येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या “सेवोत्तम” या विषयावरील एक दिवसाच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.

Chichwad : काव्यानंद प्रतिष्ठानचा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न

शासकीय कर्मचायांनी नागरिकांना उत्तम सेवा दयावी याकरिता सेवोत्तम ही संकल्पना केंद्र शासनामार्फत प्रशासनिक सुधार आणि लोक तक्रार निवारण विभाग (DARPG) या विभागामार्फत राबविण्यात येत आहे. सेवोत्तम या प्रणालीचे नागरिकांची सनद, तक्रार निवारण प्रणाली, अधिका-यांचे सक्षमीकरण हे तीन प्रमुख घटक आहेत, असे व्ही. श्रीनिवास, सचिव यांनी सांगितले.

या परिषदेमध्ये विविध राज्यांनी तयार केलेल्या तक्रार निवारण प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले. गुजरात राज्यामार्फत “स्वागत”प्रणाली, आंध्रप्रदेश यांचे “जनवाणी”, तेलंगणा राज्याची “जनहित”प्रणाली, राजस्थान सरकारची “राजस्थान संपर्क” प्रणाली, जम्मू कश्मिर राज्याची “जे.के.आयग्राम्स” प्रणाली इत्यादी राज्यांनी सादरीकरण केले.

CPGRAMS ही प्रणाली अधिक लोकाभिमुख करण्याकरिता अमरनाथ, अतिरिक्त सचिव, प्रशासनिक सुधार आणि लोक तक्रार निवारण विभाग यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यामुळे ही प्रणाली भ्रमण ध्वनीवर, गुगल प्ले स्टोअर या ॲपव्दारे उपलब्ध झाली आहे. अमरनाथ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या राष्ट्रीय परिषदेमध्ये आसाम, केरळा, गुजरात, तेलंगणा, तमिळनाडू, त्रिपूरा, पंजाब, हरियाना, राजस्थान, ओडिसा, गोवा, इत्यादी राज्यातील प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या प्रतिनिधींनी सादरीकरण केले. यशदाचे महासंचालक, पुणे (Pune) एस. चोक्कलिंगम यांनी निमंत्रितांचे स्वागत केले. तसेच, यशदा येथे सेवोत्तम प्रशिक्षण केंद्र नुकतेच स्थापन करण्यात आले असून राज्यातील सर्व विभागाच्या अधिकतम तक्रार निवारण अधिका-यांना नजिकच्या कालावधीमध्ये प्रशिक्षण देण्यात येईल, असे सांगितले.

सेवोत्तम राष्ट्रीय परिषदेचे नियोजन विश्राम देशपांडे, सल्लागार, सेवोत्तम आणि केंद्रशासनाचे उपसचिव, पार्थ सारथी भास्कर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता यशदा येथील मंगेश जोशी, निबंधक, राजेंद्र कु-हाडे, भाऊसाहेब बहीरट, अजित करपे, अनंता पोरे, भूषण गुरव, शितल कचरे, निता खोमणे, मेघा होटकर यांनी अथक परिश्रम घेतले.
या परिषदेमध्ये देशातील विविध राज्यातील सामान्य प्रशासन विभागाचे सचिव तसेच विविध राज्यस्तरीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक व प्रतिनिधी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.