Akurdi : नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळातर्फे 6 ऑक्टोबरला एक दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन 

एमपीसी न्यूज – नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ यांच्या वतीने एक दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष राज अहिरराव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. आकुर्डी येथील श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट सभागृहात शनिवारी दि. ६ ऑक्टोबरला सकाळी आठ वाजता सुरुवात होईन.

अखिल भारतीय लोककला संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते पहिल्या सत्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. तुकाराम पाटील हे असणार आहेत. तर स्वागताध्यक्ष म्हणून पिंपरी-चिंचवडचे अखिल भारतीय नाट्यपरिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर असणार आहेत. यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी महापौर राहुल जाधव, खासदार श्रीरंग बारणे, आयुक्त श्रावण हार्दीकर आदी उपस्थित राहणार आहेत.

संतसाहित्य व लोककला वास्तव आणि भवितव्य यावर ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ अॅड. भास्करराव आव्हाड दुस-या सत्रात बोलणार आहेत. यावेळी राज अहिरराव यांच्या ‘शब्दवेड’ या काव्य संग्रहाचे प्रकाशन गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दुपारी दीड वाजता अमराठी साहित्यिकांचे मराठी साहित्यात योगदान यावर चर्चा सत्र होणार आहे. त्यात ईलाही जमादार, ए. के. शेख, बदीउज्जमा बिराजदार, डॉ. शेख इकबाल यांचा सहभाग असणार आहे. तसेच माधुरी विदाटे यांच्या ‘प्रीतिषा’ या काव्य संग्रहाचे प्रकाशन होणार आहे.

दुपारी तीन वाजता साहित्यामागची प्रेरणा व निर्मिती यावर चर्चा होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक नामदेवराव जाधव हे अध्यक्ष असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रतिभा इंगोले असणार आहेत.

सायंकाळी साडे चार वाजता श्रावणी पारितोषिक प्राप्त कविता सादरीकरण व गझल गायन होणार आहे. यात समीर लाळगे,श्रीपाद शिरवडकर, उमेश चावक, संगीत झीजुरके यांचा सहभाग असणार आहे.

सायंकाळी सहा वाजता डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचा समारोप होणार आहे. यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून पिंपरी-चिंचवड नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर असणार आहेत. यावेळी प्रा. तुकाराम पाटील हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. यावेळी आमदार महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, उपमहापौर सचिन चिंचवडे, खासदार अमर साबळे आदी उपस्थित असणार आहेत.
पत्रकार परिषदेस भाऊसाहेब भोईर, आर. एस. कुमार,  माधुरी ओक आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.