Pimpari : फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे रविवारी फोटोग्राफरसाठी एकदिवसीय कार्यशाळा

एमपीसी न्यूज – फोटोग्राफर फाउंडेशन ऑफ पिंपरी-चिंचवड या नोंदणीकृत संस्थेच्या वतीने फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर यांना तांत्रिक व व्यावसायिक मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने ज्येष्ठ छायाचित्रकार पराग शिंदे आणि सौरभ जोशी यांच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे हॉटेल क्रिस्टल कोर्ट  येथे रविवारी 8 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत फ्यूजी फिल्म X सिरीज मिररलेस कॅमेरा वापरून लग्नातील व्हिडीओग्राफी आणि फोटोग्राफी कशी उत्कृष्ट करता येईल याबाबत सौरभ जोशी मार्गदर्शन करतील. तर पराग शिंदे हे पोर्ट्रेट व ग्रुप फोटोग्राफी करताना फ्लॅशचा वापर कसा करावा याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणार आहेत.

फोटोग्राफर फाउंडेशन ऑफ पिंपरी चिंचवड ही नोंदणीकृत संस्था असून शहरातील फोटोग्राफर, हौशी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, स्टुडिओ चालक, मालक, एडिटर, डिझायनर यांच्यासाठी मार्गदर्शन कार्यशाळा व परिसंवादाचे आयोजन करीत असते. वरील कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणा-यांनी प्रशांत पासलकर 9422005527, संतोष शिंदे 9960622166 यांच्याकडे नोंदणीसाठी संपर्क साधावा, असे संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.