Pimpri : संस्कृत विषयावर एकदिवसीय कार्यशाळा

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील डॉ . डी वाय पाटील आयुर्वेद महाविद्यालय रूग्णालय ,व संशोधन केंद्र पिंपरी येथे संस्कृत सिद्धांत विभागातर्फे ” वदतु संस्कृतम तथा संहिताया: अवबोधम ” या संस्कृत भाषेवर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद उत्स्फूर्त होता.

ही कार्यशाळा पंधरा दिवसाची होती. त्यात संस्कृत भाषेचा उगम ते संस्कृतची आवड इथपर्यंत संस्कृत तज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ ओजदा पोळ यांनी १५ दिवस रोज २ तास अभ्यासक्रम पूर्ण करुन घेतला.संस्कृत भाषा सहज बोलण्याचा ,उच्चारण्याचा , आगळा – वेगळा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला,

संस्कृत भारती या संस्थेचे प्रचार व प्रसार मंत्री श्री पेनोरे यांच्या व्याख्यानाने या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली . असिस्टंट डायरेक्टर ऑफ आयुष्य डॉ. व्यंकटेश धर्माधिकारी यांनी आयुर्वेदाच्या अभ्यासासाठी संस्कृत अध्ययनाचे महत्व या विषयी मार्गदर्शन केले . आयुर्वेदाचार्य डॉ. विनायक गरुड यांनी अध्ययन पद्धती विषयीचे विशेष मार्गदर्शन केले. सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. अनंत गरुड यांच्या मार्गदर्शनाने कार्यशाळेची सांगता झाली . आमदार डॉ. मेधा कुलकर्णी सल्लागार डॉ. बी पी पांडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले . विभाग प्रमुख मृदुला जोशी , डॉ. ओजदा पोळ डॉ. शीतल रासने , डॉ. निलेश पाटील , डॉ. प्रशांत खडे, डॉ. अश्विनी पाटील , व पदव्युत्तर विद्यार्थी यांच्या सहकार्याने कार्यक्रम झाला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.