Pimpri News : रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात आज (शुक्रवारी, दि. 8) सकाळी सहा वाजता घडला.

अपघात झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. वय अंदाजे 45 वर्ष आहे. मयत व्यक्तीचा चेहरा गोल. उंची 5 फुट 2 इंच, अंगाने सडपातळ, रंगाने काळा सावळा, नाक सरळ असे मयत व्यक्तीचे वर्णन आहे. मयत व्यक्तीचे कपडे रेल्वे गाडीला लटकून गेले आहेत.

मयत व्यक्तीच्या छातीवर श्री राम आणि उजव्या हातावर गोपाल असे नाव कोरलेले आहे. वरील वर्णनाच्या व्यक्तीबाबत माहिती असल्यास पिंपरी रेल्वे पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.