Mulashi Crime News : शिकारीसाठी शेतात दिला इलेक्ट्रिक करंट ; शॉक लागून इसमाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – शिकारीसाठी शेतातील लोखंडी तारेला इलेक्ट्रिक करंट देण्यात आला होता. या तारेचा शॉक लागून एका इसमाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि.27) सकाळी सातच्या सुमारास मुळशी परिसरात हा प्रकार घडला.

विठोबा पांडुरंग साठे असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा नाथ विठोबा साठे (वय 40) यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, संतोष भिकाजी साठे, राम शंकर साठे, लक्ष्मण दत्तू साठे, सदाशिव भिवा साठे (सर्व रा. भालगुडी, ता.मुळशी) यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 304 अ (2), 34, महाराष्ट्र विद्युत कायदा कलम 135, 138 वन्यजीव संरक्षण अधिनियम कलम 9 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या शेतात शिकार करण्यासाठी लोखंडी तारेला इलेक्ट्रिक करंट दिला होता. सकाळी शेतात गेलेल्या विठोबा यांना त्या तारेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पौड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.