Pimpri : लोकलच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – लोणावळा-पुणे लोकलच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा अपघात आज (बुधवारी) सकाळी सव्वाआठच्या सुमारास पिंपरी रेल्वे स्थाकाजवळ घडला.

सकाळी सव्वाआठच्या सुमारास लोणावळा-पुणे ही लोकल पिंपरी रेल्वे स्थानकावर आली. दरम्यान, लोकलच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती पिंपरी लोहमार्ग पोलिसांना मिळाली. रेल्वे पोलिसांनी तात्काळ जखमी व्यक्तीला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने जखमी व्यक्तीला तात्काळ पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला.

मयत व्यक्तीची अद्याप ओळख पटली नाही. मयत व्यक्तीचे वय अंदाजे 52 वर्ष आहे. अंगात पांढरा फुल शर्ट आहे. राखाडी रंगाची फुल पॅन्ट चेहरा उभट, रंग काळा-सावळा, नाक सरळ, अंगाने सडपातळ, केस काळे, पांढरी दाढी-मिशा पांढ-या, उंची 5 फूट 3 इंच आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.