Expressway News : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर सफारी कारचा अपघात; चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सफारी कारला मोठा अपघात झाला. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. 13) दुपारी अडीचच्या सुमारास ऊर्से गावाच्या हद्दीत घडली.

दरयास काल केरावाला (वय 31, रा. अंधेरी वेस्ट, मुंबई) असे मृत्यू झालेल्या कार चालकाचे नाव असून याबाबत रुग्णवाहिका चालक अजय मु-हे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत केरावाला हे त्यांच्या सफारी कार मधून पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावरून जात असताना ऊर्से गावाच्या हद्दीत केरावाला यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगातील कारची द्रुतगती मार्गावर सुरक्षा कठाड्याला जोरात धडक बसली आणि कार पलटी झाली. अपघातात कार चालक केरावाला हे गंभीर जखमी झाले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला असून कारचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस या प्रकरणी तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.