Wakad : प्लॉट घेऊन देण्याच्या बहाण्याने एकाची अडीच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – प्लॉट घेऊन देण्याच्या बहाण्याने एकाकडून 2 लाख 45 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन प्लॉट घेऊन न देता तसेच पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना प्रभात कॉलनी, वाकड कॉलनी, वाकड येथे घडली.

रंजना रमेश कायगुडे (वय 60, रा. वारजे), राजू लक्ष्मण इंगळे, मंजुश्री राजू इंगळे (दोघे रा. थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मोहन अर्जुन मारकड (वय 39, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 सप्टेंबर 2018 ते 1 जानेवारी 2019 या कालावधीत ही घटना घडली. आरोपी फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपींनी फिर्यादी मारकड यांना प्लॉट घेऊन देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून 2 लाख 45 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन आरोपींनी प्लॉट घेऊन दिला नाही. त्यानंतर, फिर्यादी यांनी पैसे परत मागितले असता आरोपी राजू याने ‘मी कोण आहे तुला माहिती नाही. मी एक रुपयाही देणार नाही. उलट तू आम्हाला 15 टक्के व्याज दराने पैसे दिल्याचा खोटा गुन्हा दाखल करून आत टाकीन,’ अशी धमकी दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.