Hinjwadi : ‘कंपनीकी गाडी लेने आया हूँ’, असे म्हणत एकाने फॉर्च्यूनर पळवली

एमपीसी न्यूज – सर्व्हिंसिंगसाठी दिलेली फॉर्च्यूनर मोटार देण्यासाठी जाणार्‍या सेंटरच्या कर्मचार्‍याला अनोळखी तरुणाने ’हमारी कंपनीकी गाडी है, लेने आया हूँ’, असे म्हणत सर्व्हिंसिंगचे अर्धेच पैसे देऊन मोटार घेऊन पसार झाला. ही घटना बावधन येथील कोठारी टोयोटा सर्व्हिंस सेंटर येथे गुरूवारी घडली.

विकास दारासिंग परदेशी (वय-34, रा. तिरूपती नगर, वारजे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथील कोठारी टोयोटा सर्व्हिस सेंटरमध्ये सर्व्हिससाठी (एमएच-44 के. 7707) ही पांढर्‍या रंगाची फॉर्च्यूनर मोटार आणली होती. तिचे सर्व्हिंसिंग झाल्यानंतर फिर्यादी गुरूवारी मोटार देण्यासाठी जात होते. त्यावेळी तेथे आलेल्या अनोळखी तरूणाने ’ये हमारी कंपनीकी गाडी है, मै लेने आया हू’, असे म्हणत विकासने सर्व्हिंसिंगचे 13 हजार 417 रूपये देण्यास सांगितले. त्यानुसार आरोपीने फक्त सात हजार रूपये दिले. उर्वरित हिंजवडी येथील कार्यालयातून देतो, असे सांगून फॉर्च्यूनर मोटार घेऊन आरोपी पसार झाला. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.