Pune : पी ए इनामदार एज्युकेशन ट्रस्टच्या  तिन्ही शाळांचा शंभर टक्के  निकाल 

One hundred percent result of all three schools of P.A. Inamdar Educational Trust.

एमपीसी न्यूज – पी ए इनामदार एज्युकेशन ट्रस्टच्या वडगाव शेरी येथील तिन्ही शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के  लागला आहे.

लेडी तेहरुन्निसा इनामदार इंग्लिश मिडीयम हायस्कुल मध्ये दिव्या संदीप गावडे हिने 87 टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.

तस्मिया जमादार हिने 83 टक्के गुण मिळवून लेडी तेहरुन्निसा इनामदार उर्दू मिडीयम हायस्कुल मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.

तर, लेडी तेहरुन्निसा इनामदार मराठी मिडीयम हायस्कुल मध्ये प्रणय लताम्बळे याने 90 टक्के गुण  मिळवून  प्रथम क्रमांक पटकावला आहे.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी ए इनामदार, अबेदा इनामदार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अब्बास शेख यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.