Bhosari : ज्येष्ठ नागरिकाच्या पेन्शन खात्यातून सव्वा लाख रुपयांचा अपहार

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ नागरिकाच्या पेन्शन खात्यातून अज्ञात इसमाने 1 लाख 20 हजार रुपये काढून त्यांची फसवणूक केली. ही घटना तीन सप्टेंबर रोजी घडली.

अनिल विष्णुपंत देशमुख (वय 67, रा. चिखली प्राधिकरण) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये पेन्शन खाते आहे. त्यांच्या खात्यातून अज्ञात इसमाने एक लाख वीस हजार रुपये काढून घेतले. यातील काही रक्कम ट्रान्सफर केली, तर काही रक्कम एटीएममधून काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.