Crime News : बारामतीत दिवसाढवळ्या अल्पवयीन मुलांकडून एकाचा खून

एमपीसी न्यूज – बारामती शहरातील श्रीराम नगर भागात अल्पवयीन मुलांनी एका 47 वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून केलाय.शशिकांत बाबासो कारंडे (वय 47) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जुन्या भांडणाच्या वादातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास बारामतीच्या श्रीराम नगर परिसरातील कवी मोरोपंत शाळेजवळ ही घटना घडली. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शशिकांत कारंडे हे नातवाला नेण्यासाठी शाळेजवळ आले होते. यावेळी काही अल्पवयीन आरोपींनी त्यांच्यावर कुराडीने हल्ला केला.या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने कारंडे यांचा मृत्यू झाला.

कारंडे हे बारामती परिसरातील एका कंपनीत नोकरीला होते.काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाची आरोपी मुलांसोबत भांडण झाली होती. आणि याच वादातून हा खून झाल्याची चर्चा परिसरात आहे. खून झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. बारामती पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.