Lonavala Crime News : खंडाळ्यात दुचाकी व कार अपघातात एक ठार; एक गंभीर जखमी

एमपीसीन्यूज : मुंबई पुणे महामार्गावर खंडाळा येथे दुचाकी व कार यांच्यात गुरुवारी सायंकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभिर जखमी झाला.

याप्रकरणी स्विफ्ट कार चालक हनुमंत लक्ष्मण किरवे (वय 42, रा. घनसोली, नवी मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.

खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरवे हे त्यांच्या त‍ाब्यातील स्विफ्ट कार (MH 46 BQ 4163) घेऊन मुंबईच्या दिशेने जात असताना समोरून वेगात आलेली दुचाकी (MH 46 BH 2770) ही कारला दर्शनी भागाला जोरात धडकली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर पडले होते.

गंभीर मार लागल्याने मुस्किम सलिम शेख (वय 19, रा. बानोज बौद्धवाडा, खोपोली पोलीस स्टेशनजवळ, खोपोली) हा उपचारापुर्वीच मयत झाला तर दुचाकीवरील अन्य एकावर कामशेत येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव य‍ांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन शिंदे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.