Hinjawadi News : भरधाव दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – मुळशी तालुक्यातील सुसगाव येथे एका भरधाव दुचाकीने दुसऱ्या दुचाकीस जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि. 20) रात्री साडे सात वाजताच्या सुमारास शिवबा चौकाजवळ घडला.

नितीन नरवाडे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर संदीप भुकतरे (रा. सुसगाव) हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी विनोद रामा नरवाडे (वय 31, रा. सुसगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनोळखी दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ नितीन नरवाडे आणि त्याचा मित्र संदीप हे दोघेजण सुसगाव येथून दुचाकीवरून जात होते. शिवबा चौकाजवळ त्यांच्या दुचाकीस एका अनोळखी दुचाकीने जोरात धडक दिली. या अपघातात फिर्यादी यांचा भाऊ नितीन नरवाडे याचा मृत्यू झाला. तर त्याचा मित्र संदीप हा गंभीर जखमी झाला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.