Mhalunge accident : कारच्या धडकेत एकाचा मृत्यू ; एक जण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकी वरील एकाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. (Mhalunge accident) ही घटना शनिवारी (दि. 19) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास चाकण तळेगाव रोडवर म्हाळुंगे येथे घडली.

 

ऋतिक आनंत मुसळे (वय 21) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आशिष सुरेंद्र सिंह (वय 23, रा. महाळूंगे, ता. खेड. मूळ रा. मध्य प्रदेश) असे जखमी तरुणाचे नाव आहे.(Mhalunge accident) आशिष यांनी याप्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एम एच 46 / ए एक्स 1149 या क्रमांकाच्या कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Pune : शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन तर्फे रक्तदान शिबिर संपन्न

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशिष आणि त्यांचा मित्र दुचाकीवरून तळेगाव चाकण रोडने जात होते. महाळुंगे येथे त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात जाणाऱ्या कारने धडक दिली.(Mhalunge accident) यामध्ये ऋतिकी यांचा मृत्यू झाला. तर आशिष गंभीर जखमी झाले आहेत. म्हाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.