Bhosari: विक्रीसाठी आणलेला पाऊण किलो गांजा तरुणाकडून जप्त

एमपीसी न्यूज – गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून 830 ग्रॅम वजनाचा 20 हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

सचिन संतोष दगडे (वय 19, रा. येरवडा), असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार बाळासाहेब सूर्यवंशी यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री अकराच्या सुमारास एक तरुण डोळस वस्तीकडे जाणा-या रोडवर एक तरुण येणार असून त्याच्याकडे गांजा असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार परिसरात सापळा रचून सचिन याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे  830 ग्रॅम वजनाचा 20 हजार रुपयांचा गांजा आढळून आला. गांजा जप्त करून सचिन याला अटक केली. त्याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.