Pimpri : उघड्या दरवाजावाटे एक लाख 64 हजारांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातून एक लाख 64 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. हे घटना 27 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता भीमनगर, पिंपरी येथे उघडकीस आली आहे.

रेखा मच्छिंद्र केदारी (वय 65, रा. भीमनगर, पिंपरी) यांनी याबाबत बुधवारी (दि. 28) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा ठेऊन झोपल्या होत्या. त्यावेळी उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. घरातून लबाडीने चोरट्याने एक लाख 64 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हा प्रकार 27 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.