Hinjwadi : बावधनमध्ये एक लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – कुलूप लावून बंद असलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ड्राव्हरमधील सोन्याचे दागिने, रोकड असा 1 लाख 10 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बावधन येथे शुक्रवारी दुपारी तीन वाजता उघडकीस आली.

महेश जगन्नाथ थोरात (वय 38, रा. मातोश्री बिल्डींग, बावधन), यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महेश यांचा शुक्रवारी सकाळी 10 ते दुपारी 3 या कालावधीत फ्लॅट कुलूप लावून बंद होता. अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. ड्रॉव्हरमधील सोन्याचे दागिने, रोकड असा 1 लाख 10 हजार 400 रूपयांचा ऐवज चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.