Chinchwad : चिंचवड येथे एक लाखाची घरफोडी

एमपीसी न्यूज – चिचंवडमधील तानाजीनगर येथे एक लाखांची घरफोडी झाली. ही घटना बुधवारी (दि. 11) सकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली.

_MPC_DIR_MPU_II

ओंकार अनिल देशपांडे (वय 36, रा. कोथरूड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ आदित्य याचे चिंचवड येथे घर आहे. सोमवारी (दि. 9) सकाळी अकरा ते बुधवारी (दि. 11) पहाटे पाच वाजण्याच्या कालावधीत त्यांचे घर बंद होते. दरम्यानच्या कालावधीत घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातून 79 हजार रुपयांचे 8 तोळे सोन्याचे दागिने, 8 हजार रुपये किमतीचे चांदिचे ब्रेसलेट आणि चार हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 91 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.