Akurdi : डेबिट कार्ड सुरू करण्याच्या बहाण्याने एक लाखाची फसवणूक  

एमपीसी न्यूज – मी बँकेचा कर्मचारी असून तुमचे डेबिट कार्ड सुरू करून देतो, असे सांगून एकाला 1 लाखांना गंडविले. ही घटना आकुर्डी येथे 14 मे 2019 रोजी घडली.

रूपेशकुमार श्रीबिरंचीप्रसाद बर्नवाल (वय 36, रा. इन्कमटॅक्स कॉलनी, कृष्णानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बर्नवाल यांना 14 मे रोजी 8016431477 या मोबाईल धारकाने फोन केला. मी बँकेचा कर्मचारी असून तुमचे डेबिट कार्ड सुरू करून देतो, असे खोटे सांगितले. त्याच्या खात्यातून 1 लाख 8 हजार 476 रूपये आरोपीने स्वतःच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करून बर्नवाल यांची फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.