Pune Crime News : भारती विद्यापीठ आणि अलंकार पोलिसांच्या हद्दीतून एक लाखांचे दागिने चोरीला

सोनसाखळी चोरीच्या घटना सुरूच

एमपीसी न्यूज : पुणे शहरात सोनसाखळी चोरटे यांनी उच्छाद मांडला असून दररोज कुठे ना कुठे रस्त्यावरून जाणाऱ्या एकट्या दुकट्या महिलांना टार्गेट करून चोरटे गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करत आहेत. भारती विद्यापीठ आणि अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीतही असाच प्रकार उघडकीस आला असून चोरट्यांनी तब्बल एक लाखांचे दागिने चोरून नेले.

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील तळजाई पठार परिसरात एक 47 वर्षीय महिला व्यायामासाठी गेली असताना समोरून पायी आलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेले. त्याची किंमत तीस हजार रुपये इतकी आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

दुसरी घटना अलंकार पोलीस स्टेशनच्या अनुरेखा सोसायटी व गौरंग सोसायटी यांच्या कॉर्नरवर घडली. एका 68 वर्षीय ज्येष्ठ महिला पतीसोबत रात्रीच्या वेळी पाणी फिरत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तीने पैकी पाठीमागे बसलेल्या एका व्यक्तीने फिर्यादी महिलेच्या गळ्यातील पस्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जोरात हिसका मारून चोरून नेले. अलंकार पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.