Nigdi : एकाची एक लाखाची ऑनलाईन फसवणूक

एमपीसी न्यूज – परदेशात शिक्षणासाठी असलेल्या मुलाला पैसे पाठविणार्‍याची एक लाखाची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना निगडी येथे नुकतीच घडली.

जाकीर अब्बास शेख (वय-47, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिषेक शर्मा नावाच्या तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा परदेशात शिक्षणासाठी आहे. मुलाला पैसे पाठविण्यासाठी त्यांनी गुगलवर वेस्टर्न युनियन सर्च केले. त्यावेळी आरोपी शर्मा याचा 08509191631 हा मोबाईल क्रमांक आला. आरोपीने शेख यांना एक लिंक पाठविली. त्यावर सुरूवातीला पाच रूपयांचे पेमेंट करण्यास सांगितले. त्यानुसार शेख यांनी पाच रूपये पाठविले. त्यानंतर शेख यांच्या बँकेच्या खात्यातून आरोपीने 1 लाख रूपये काढून घेत त्यांची फसवणूक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.