Wakad : तरूणाची एक लाखांची ऑनलाईन फसवणूक

एमपीसी न्यूज – तरूणाच्या एचडीएफसी बँकेच्या बचत खात्यातून वेळोवेळी एक लाख रूपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना नुकतीच वाकड येथे उघडकीस आली.

अंकित संजयकुमार श्रीवास्तव (वय-25, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हे त्यांच्या मूळ गावी उत्तर प्रदेशातील बल्लालपूर येथे गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्याचे डेबीट कार्डही होते. मात्र, त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या बचत खात्यातून अज्ञात आरोपीने आठ वेळा 80 हजार रूपये काढून घेत फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.