One month completed to Sushant’s death – अंकिताची सुशांतला भावपूर्ण श्रद्धांजली!

One month completed to Sushant's death - Ankita pays heartfelt tribute to Sushant!

एमपीसी न्यूज – आज अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला एक महिना पूर्ण झाला. मागील 14 तारखेला म्हणजे 14 जूनला सुशांतने अचानक कोणाला काहीही कल्पना नसताना घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या या टोकाच्या कृत्याचे सकृतदर्शनी काहीच कारण पुढे आले नाही. त्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले गेले. पण अजूनही त्याच्या मृत्यूचे ठोस कारण कळलेले नाही. मात्र सुशांतच्या मृत्यूने त्याची एक्स-गर्लफ्रेंड  अंकिता लोखंडेलादेखील जबर धक्का बसला. तब्बल एक महिन्यानंतर अंकिताने त्याच्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली आहे.  

सुशांतच्या मृत्यूनंतर ती सोशल मीडियावर सक्रिय नव्हती, परंतु एका महिन्यानंतर अंकिताने तिची पहिली पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने आपले दुःख व्यक्त केले आहे. यात अंकिताने एक फोटो पोस्ट केला असून तो तिच्या घरातील देव्हा-याचा असून तेथे दिवा लावलेला दिसत आहे. अंकिताने सुशांतच्या स्मरणार्थ हा दिवा देवासमोर ठेवला आहे. अंकिताने या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘चाइल्ड ऑफ गॉड’ (देवाचा मुलगा) असे लिहून सुशांतला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

अंकिताची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. एका यूजरने अंकिताच्या या पोस्टवर कमेंट करताना लिहिले, ‘एसएसआर’ म्हणजे सुशांत सिंह राजपूत. आणखी एका यूजरने लिहिले, ‘तुला खूप प्रेम’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.