Pimpri: कोरोनाचा विळखा वाढला! आणखी एक ‘पॉझिटीव्ह’; सक्रिय रुग्णांची संख्या 18

आजपर्यंत 30 जणांना कोरोनाची लागण, 12 जण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा वाढत आहे. मागील चार दिवसांपासून शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत दररोज वाढ होत आहे. आता ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील एका 41 वर्षीय पुरुषाचे कोरोनाचे रिपोर्ट ‘पॉझिटीव्ह’ आले आहेत. यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 18 झाली आहे. त्यातील तिघांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, आजपर्यंत 30 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरात कोरोनाचा विळखा वाढत आहे. मागील चार दिवसांपासून शहरात दररोज कोरोनाच्या रुग्णात वाढ होत आहे. मागील चार दिवसात 9 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आता आणखी एका 41 वर्षीय पुरुषाचे रिपोर्ट ‘पॉझिटीव्ह’ आले आहेत. त्यामुळे त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी (दि. 9) पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णाच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील हा रुग्ण आहे.

तर, दुपारी पुण्यातील रुग्णालयात नोकरीला असलेल्या आणि पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्याला असलेल्या नर्सचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. या नर्सवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज शनिवारी (दि. 11) एकाच दिवशी शहरातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील 30  जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित सक्रिय 15 रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, तीन सक्रिय कोरोना बाधित रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.