Pimpri: सलग पाचव्या दिवशी शहरात कोरोनाचा रुग्ण; नर्सचा पती पॉझिटिव्ह;  सक्रिय रुग्णांची संख्या पोहचली 19 वर

आजपर्यंत 31 जणांना कोरोनाची लागण, 12 जण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सलग पाच दिवसांपासून कोरोना रुग्णाचे पॉझिटिव्ह रिपोर्ट येत आहेत. शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या  नर्सच्या पतीचे रिपोर्ट आज (रविवारी)  ‘पॉझिटीव्ह’ आले आहेत. यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 19 झाली आहे. त्यातील तिघांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, आजपर्यंत शहरातील 31 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरात कोरोनाचा विळखा वाढत आहे. मागील पाच दिवसांपासून शहरात दररोज कोरोनाच्या रुग्णात वाढ होत आहे. मागील चार दिवसात 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पुण्यातील रुग्णालयात नोकरीला असलेल्या आणि पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्याला असलेल्या नर्सचे रिपोर्ट  शनिवारी पॉझिटिव्ह आले होते. या नर्सच्या पतीचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्यांचे  रिपोर्ट  देखील  आज रविवारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील 31  जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित सक्रिय 16 रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, तीन सक्रिय कोरोना बाधित रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.