Wakad Crime News : गावठी पिस्टल जवळ बाळगल्याप्रकरणी सांगवीतील एकाला अटक  

एमपीसी न्यूज – गावठी पिस्टल जवळ बाळगल्याप्रकरणी सांगवीतील एकाला अटक करण्यात आली असून रहाटणी येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगताप डेअरी चौकातील पुलाखाली आरोपीला शुक्रवारी (दि.03) ताब्यात घेतले.

मयुर अकबर औचरे (वय 23, रा. पीडब्लूडी कॉलनी, सांगवी) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर शुभम खडसे (रा. रहाटणी) असे गुन्हा दाखल झालेल्या दुस-या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बेकायदेशीरपणे जवळ 40 हजार रूपये किंमतीचे गावठी पिस्टल बाळगले होते, तसेच त्याच्या जवळ दोन राऊंड देखील मिळून आले. वाकड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अभिजीत जाधव अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.