Chikhali : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला व तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एकावर विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जून 2019 ते 4 जानेवारी 2020 या कालावधीत घडला.

जाधववाडी चिखली येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 17 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीने पुणे ग्रामीणमधील आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा गुन्हा चिखली पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित मुलीचा पाठलाग करीत असे. मुलीला फोन करण्याची धमकी देत फोन न केल्यास तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देत असे. त्याच्याकडून वारंवार होणा-या त्रासाला कंटाळून तसेच घरी बदनामी होईल या भीतीने पीडित मुलीने विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर, याबाबत पुणे ग्रामीण येथील आळेफाटा पोलीस ठाण्यात विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचाराचा (पॉस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा चिखली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.