Pimpri : तरुणीच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – कामानिमित्त मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेल्या तरुणीशी गैरवर्तन करत एका तरुणाने तिचा विनयभंग केला. ही घटना बुधवारी (दि. 4) रात्री दहाच्या सुमारास संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली.

ओमकार नवनाथ लांडे (वय 20, रा. तिन्हेवाडी रोड, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी तिच्या मैत्रिणींना प्रॅक्टिकलचे जनरल देण्यासाठी जात होती. त्यावेळी आरोपी तेथे आला. त्याने फिर्यादी तरुणीशी गैरवर्तन केले. आरोपी तरुणाने फिर्यादी तरुणीच्या वडिलांना बघून घेण्याची धमकी दिली. त्यावेळी तरुणीच्या घर मालकीण तिथे आल्या. त्यांनी हा वाद सोडविल्यानंतर आरोपी निघून गेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.