Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात एक अधिकारी शहीद, 9 जवान जखमी

एमपीसी न्यूज : माओवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात जवळपास ९ जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा परिसर हा माओवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या भागात सीआरपीएफच्या तुकडीवर जवानांनी हा भीषण हल्ला केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोबरा बटालियनचे जवान माओवादविरोधी अभियानावर गेले होते. रात्री परत येत असताना साडे आठच्या सुमारास बुर्कापाल कॅपच्या सहा किलोमीटर आधी माओवाद्यांच्या अॅम्बुशमध्ये जवान फसले. यावेळी माओवाद्यांनी तिथे IED ब्लास्ट घडवून आणला. या स्फोटात दहा जवान जखमी झाले आहेत.

जखमी जवानांना उपचारासाठी रायपूर इथल्या रुग्णालयात दाखल करणं अत्यावश्यक होतं. त्यासाठी रात्री उशिरा हेलिकॉप्टरच्या मदतीनं 8 गंभीर जखमी झालेल्या जवानांना रायपूरमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलं आहे. त्यापैकी दोन अधिकाऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. पीपल पीपल्स गुरील्ला आर्मी दोन डिसेंबरपासुन सुरु होण्याच्या पार्श्वभुमीवर माओवाद्यानी हा हल्ला केला असल्याची माहिती मिळाली आहे.

माओवाद्यांचा हल्लयात नाशिकचे रहिवासी असलेले सहाय्यक कमांडेट नितीन भालेराव शहीद झाले आहेत. कोबरा बटालीयन 206 चे अधिकारी असलेले नितीन भालेराव हे जवानासोबत अभियानावरुन परतत असताना गंभीर जखमी झाले होते. राञी हॅलीकॅप्टरने उपचारासाठी रायपुरला हलवले त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

गडचिरोली भामरागड तालुक्यात 26 नोव्हेंबरला माओवाद्यांनी लाहेरी-भामरागड मार्ग बंद पाडून माओवाद्यांनी एसटी बस अडवली होती. या मार्गावर झाडे तोडून पीपल्स गुरील्ला आर्मी सप्ताह साजरा करण्याचे बॅनर्स माओवाद्यांनी लावले होते. आलापल्लीहून लाहेरीकडे जाणारी बस रात्री उशिरा माओवाद्यांनी हिंदेवादा जवळ अडवली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.