Pune : हैद्राबादहूून पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या इसमाला अटक

पिस्तूल व दोन जिवंत काडतूस जप्त

एमपीसी न्यूज – गावठी पिस्तूल विक्रीसाठी हैद्राबादहून आलेल्या इसमाला फरासखाना पोलिसांनी काल रविवारी (दि.21) बुधवार पेठेतील क्रांती हॉटेल चौकातून ताब्यात घेतले.

शिवकुमार ऊर्फ शिवा नरसिंग पाथलावत(वय 20, रा.हैदराबाद) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  काल रविवारी फरासखाना परिसरात गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी महावीर वलटे यांना त्यांच्या खबऱ्याकडून बुधवार पेठ येथील क्रांती हॉटेल चौकात कंबरेला पिस्तुल लावून उभा असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलिसानी तेथे जाऊन पाहणी केली असता पोलिसांना पाहताच तो पळून जाऊ लागला.पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडले व त्याची विचारपूस केली. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 30 हजार 800 रुपयांचा माल मिळून आला.त्याने ते पिस्तुल कोणाला तरी विक्री करण्यासाठी आणले होते असे तपासात समोर आले.

त्या प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फरासखाना पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.