Pimpri: ग्रीन झोन ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत कोरोनाचा शिरकाव; विकासनगरमधील पोलीस खात्यातील युवकाला कोरोनाची लागण

one person from police department tested positive for coronavirus, from Vikasnagar, Kiwale, PCMC b zone which was considered green zone till now

एमपीसी न्यूज – कोरोनामुक्त असल्याने ग्रीन झोनमध्ये  असलेल्या  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. किवळे, विकासनगर येथील पोलीस खात्यात सेवेत असलेल्या एका युवकाचे आज (शुक्रवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  तर, पुण्यातील घोरपडी पेठ आणि येरवड्यातील दोघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार,  महापालिकेने कोरोना संशयितांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट सकाळी आले आहेत. त्यामध्ये किवळे, विकासनगर येथील 34 वर्षीय युवकाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

त्यामुळे आजपर्यंत कोरोनामुक्त असलेल्या ‘ब’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे.  रावेत,  किवळे, विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड परिसर येत असलेला ‘ब’ प्रभागाती परिसर आजपर्यंत कोरोनामुक्त होता.

आता महापालिकेच्या आठही क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण झाले आहेत.  हा युवक पिंपरी-चिंचवड पोलीस खात्यात सेवेत आहे.

पुण्यातील घोरपडी पेठ आणि येरवड्यातील कामगारनगर येथील 39 वर्षीय महिला आणि 60 वर्षीय पुरुष दोघांचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांच्यावर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

महापालिका रुग्णालयात सक्रिय 58 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, पिंपरी-चिंचवड शहरातील 184 आणि शहराबाहेरील 22 अशा 206 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. 116 जणांनी आत्तापर्यंत कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर, 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.