Chinchwad : ग्रेड सेपरेटरमध्ये दुचाकीचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई महामार्गावर ग्रेड सेपरेटरमध्ये दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात आज, सोमवारी (दि. 16) दुपारी पावणेपाचच्या सुमारास चिंचवड येथे झाला.
मयत आणि जखमींची नावे समजू शकली नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, एम महिला आणि पुरुष दोघेजण एम एच 14 / एफ एफ 7443 या दुचाकीवरून पिंपरीकडून निगडीच्या दिशेने जात होते. चिंचवड येथील महावीर चौकाच्या खाली ग्रेड सेपरेटरमध्ये आल्यानंतर दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी ग्रेड सेपरेटर मधील कठड्याला घासली. काही अंतर दुचाकी घासत गेली. यामध्ये दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. जखमीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.