Pune Crime News : एमडी (मेफेड्रोन) विक्रीसाठी आला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडला

One person who came to sale MD(mephedrone) was caught by the police.

एमपीसी न्यूज- अंमली पदार्थ एमडी (मेफेड्रोन) विक्रीसाठी पुणे शहरात आलेल्या एकाला पोलिसांनी अटक केली. आसीफ युसूफ खान ( वय 36 वर्षे रा भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून 61,850 रुपये किंमतीचे 12 ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी खडक पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना वरील आरोपी भवानी पेेेठेत अंमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी नेवासकर पेट्रोलपंपाजवळ सापळा रचून ही कारवाई केली. आरोपीला अटक केली असून त्याच्यावर खडक पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस कलम 8(क), 22(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी खडक पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.