Lonavala : पोपटाला पिंजऱ्यात कोंडल्याबद्दल 25 हजाराचा दंड व दहा झाडे लावण्याची शिक्षा

एमपीसी न्यूज- पोपटाला पिंजऱ्यात कोंडल्याबद्दल एका रिसॉर्ट मालकाला वडगाव न्यायालयाने 25 हजार रुपयांचा दंड आणि दहा झाडे लावण्याची शिक्षा ठोठावली आहे.

खंडाळयातील मिस्टीका रिसॉर्टमध्ये देशी पोपट पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवला होता. याची माहिती वनविभागाला कळताच त्यांनी तात्काळ याची दखल घेत रिसॉर्ट मालक पी टी गिरीमोहन याच्या विरोधात वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी वनरक्षक गणेश झिरपे यांनी फिर्याद दाखल दिली आहे.

आरोपी गिरीमोहन याने स्वत:च्या खंडाळा मिस्टीका रिसॉर्टमध्ये एक देशी पोपट पिंज-यात बंदीस्त ठेवला होता, ही माहिती कळताच वनविभागाने सदर रिसॉर्टमध्ये छापा टाकुन पिंजरा व पोपट ताब्यात घेतला.

आरोपी पी टी गिरीमोहन याच्यावर वडगाव मावळ न्यायालयात चार्जशिट दाखल केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.ए.मुळीक यांनी आरोपीला 25 हजार रुपये दंड व दहा आठ फुटी झाडे लावण्याची शिक्षा सुनावली. अशाप्रकारचे गुन्हयाबाबत माहिती देण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांनी मावळवासीयांना केले असुन देशी पोपट पिंज-यात बंदिस्त करणे, भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ चे उल्लंघन होत असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.