Pune Metro News : मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मार्गांपैकी एका बाजूच्या टनेलचे काम पूर्ण

एमपीसी न्यूज – शिवाजी नगर ते स्वारगेट या सहा किलोमीटर लांबीच्या भुयारी मेट्रो मार्गाच्या एक टनेल खोदण्याचे काम पूर्ण झाले आहे. कृषी महाविद्यालय ते स्वारगेट या भुयारी मार्गाची लांबी 6 किमी असून जाण्यासाठी व येण्यासाठी असे दोन टनेल बांधण्यात येत आहे. या दोन टनेल पैकी एका बाजूचे टनेल खोदण्याचे काम आज (शुक्रवारी, दि. 14) पूर्ण झाले आहे. एकूण 12 किलोमीटर लांबीच्या टनेल पैकी 10.8 किलोमीटर (90 टक्के) टनेलचे काम पूर्ण झाले आहे. आज स्वारगेट वरून निघालेले पवना नावाचे टनेल बोरींग मशीन बुधवार पेठ येथील भूमिगत स्थानकात पोहोचले आणि ब्रेक थ्रू साधला गेला आहे.

पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा मार्ग भुयारी आहे. या मार्गिकेची लांबी सहा किलोमीटर आहे. त्यामध्ये शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट ही पाच भूमिगत मेट्रो स्थानके आहेत. कृषी महाविद्यालय ते स्वारगेट या भुयारी मार्गाची लांबी सहा किलोमीटर असून या मार्गावर जाण्यासाठी व येण्यासाठी असे दोन टनेल बांधण्यात येत आहेत. या दोन टनेल पैकी एका बाजूचे टनेल खोदण्याचे काम पूर्ण झाले आहे.

एकूण 12 किलोमीटर टनेलपैकी 10.8 किमी (90 टक्के) टनेलचे काम पूर्ण झाले आहे. आज स्वारगेट वरून निघालेले पवना नावाचे टनेल बोरींग मशीन बुधवार पेठ येथील भूमिगत स्थानकात पोहोचले आणि ब्रेक थ्रू साधला गेला आहे. स्वारगेट मधून निघालेले चौथे टनेल बोरिंग मशीन मंडई स्थानकाजवळ आहे. लवकरच ते उर्वरीत 1.2 किमीचा बोगदा पुर्ण करून बुधवार पेठ स्थानकाजवळ मार्च 2022 अखेरीस पोहोचेल.

आज पर्यंत स्वारगेट स्थानकाचे 45 टक्के, मंडई स्थानकाचे 20 टक्के, बुधवार पेठ स्थानकाचे 40 टक्के, सिव्हिल कोर्ट स्थानकाचे 75 टक्के आणि शिवाजीनगर स्थानकाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. भुयारी टनेलमध्ये मेट्रोसाठी आवश्यक असणाऱ्या विद्युत वाहक तारांची कामे सुरु झाली आहेत. सिग्नलिंग आणि कम्युनिकेशन संबंधित कामे देखील सुरु आहेत. ट्रॅक टाकण्यासंबंधीची प्राथमिक कामे देखील सुरु आहेत.

महामेट्रोचे डिसेंबर 2022 मध्ये भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, “भुयारी मार्गाचे काम अत्यंत आव्हानात्मक आहे. सर्व पुणेकर नागरिक आणि सर्व शासकीय संस्थांच्या पाठिंब्यामुळेच 90 टक्के टनेलचे कामे वेळेत पूर्ण करता आले. आज पवना टीबीएम मशीनद्वारे बुधवार पेठ येथे ब्रेक थ्रू साधला गेला आणि एका बाजूचा टनेल खोदण्याचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच संपूर्ण टनेलचे कामे पूर्ण होईल असा विश्वास डॉ. दीक्षित यांनी व्यक्त केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.