मित्र जेलमध्ये गेला म्हणून एकाला शिवगाळ करत मारहाण

एमपीसी न्यूज – माझा मित्र तुझ्या बहिणीमुळे जेलमध्ये गेला म्हणत सहा जणांनी एकाला मारहाण करत शिवीगाळ गोंधळ घातला. हा प्रकार शनिवारी (दि.26)टेल्कोरोड भोसरी येथे घडला.

नागेश जोगदंड, तम्बा जोगदंड, सुरज हानवते, महेश हानवते, वैभव जोगदंड, अविनाश जाधव सर्व राहणार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 17 वर्षीय मुलाने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यत फिर्याद दिली आहे.

PCMC: भामा-आसखेड जॅकवेल कामाची निविदा रद्द करा, नव्याने निविदा प्रक्रिया राबवा – अजित गव्हाणे

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी यांनी फिर्यादीच्या घरी येत फिर्यादीच्या आजीला शिवीगाळ करत फिर्यादी यांना नागेश याने तुझ्या बहिणीमुळे माझा मित्र जेलमध्ये आहे. माझी गाडी पण पोलिसांकडे आहे म्हणत बेकादेशीर जमाव जमवून फिर्यादी त्यांचा भाऊ गुरु पैठणकर यांना मारहाण करत जखमी केले, यावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.