Chakan News : सोसायटीचा चेअरमन होऊ द्यायचे नाही म्हणून एकास चामडी पट्ट्याने मारहाण

एमपीसी न्यूज – सोसायटीचा चेअरमन होऊ द्यायचे नाही म्हणून तिघांनी मिळून एका व्यक्तीला रस्त्यात अडवून चामडी पट्ट्याने तसेच दगडाने बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 17) रात्री अकरा वाजताच्या सुमारास भांबोली गावात घडली.

महेंद्र उमेश पडवळ (वय 34, रा. रामचंद्र डोंगर पायथ्याजवळ, भांबोली, ता. खेड) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवी आनंदा कड (रा. शेलु), पांडुरंग नारायण कड, एकनाथ ज्ञानेश्वर कड (रा. भांबोली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना सोसायटीचा चेअरमन होऊ  द्यायचे नाही, या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना गुरुवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास भांबोली गावातील एका हॉटेलसमोर रस्त्यावर गाठले. फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना शिवीगाळ करून शर्ट फाडला. तसेच दगडाने आणि चामडी पट्ट्याने मारहाण करून फिर्यादी यांच्या खांद्याला आणि पाठीवर दुखापत केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.