Dehuroad News : स्टोअर रूममध्ये दारू पिण्यास विरोध केल्याने एकावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – स्टोअर रूममध्ये दारू पिण्यास विरोध केल्याने एकावर दुचाकीवरून जात असताना कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यात दांपत्य दुचाकीवरून खाली पडून जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. 16) रात्री देहूरोड येथे घडली. 

अब्बास इस्माईल शेख (वय 40, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी बुधवारी (दि. 18) याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कादिर कलीम खान आणि त्याच्या साथीदार राज (पूर्ण, नाव माहित नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्बास शेख यांनी आरोपींना स्टोअर रूममध्ये दारू पिण्यास विरोध केला. याचा राग आरोपींच्या मनात होता. सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी शेख आणि त्यांची पत्नी दोघेजण दुचाकीवरून जात होते. ते थॉमस कॉलनी, देहूरोड येथे आले असता समोरून दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर कोयत्याने वार केला. फिर्यादी यांनी तो वार चुकवला. मात्र ते दुचाकीवरून खाली पडले व गंभीर जखमी झाले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.