Crime News : किरकोळ कारणावरून चिखलीमध्ये एकावर चाकूने वार

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून एकाला चाकूने हातावर व पोटावर वार करण्यात आले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि.23) चिखलीतील कृष्णानगर भाजी मंडई जवळ घडली.

याप्रकरणी कैलास दशरथ खाडे (वय 23 रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून विनायक राजु ननवरे (वय 21 रा. चिखली) व दोन अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. यातील विनायक याला पोलिसांनी अटक केली आहे.

Chinchwad Murder : चिंचवड येथे दगडाने ठेचून तरुणाचा खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला रिक्षाला हात लावू नको म्हणत आरोपीने भांडणास सुरुवात केली व याच भांडणात त्याने फिर्यादीच्या हातावर व पोटावर चाकूने वार करत गंभीर जखमी केले आहे. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली आहे.यावरून आरोपीला अटक केली असून चिखली पोलीस याचा पुढिल तपास घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.