Hadapsar : “मर्डरला रिप्लाय मर्डरनेच देणार म्हणत हडपसरमध्ये भर रस्त्यात एकावर धारदार शस्त्राने वार

एमपीसी न्यूज : खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या (Hadapsar) आणि सध्या जामिनावर बाहेर असलेल्या एका गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हडपसरच्या 32 नंबर शाळेजवळ बुधवारी हा प्रकार घडला. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओम उर्फ पिंटू भंडारी (वय 23), सागर घायतडक (वय 19), राजन लावंड (वय 22) आणि मेघराज शितोळे यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एक ते तीन आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. प्रदीप दिनकर देवकर यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे मित्र शुभम भोंडे यांच्यासोबत रिक्षाने घरी जात होते. त्यावेळी आरोपी दोन दुचाकीवरून त्या ठिकाणी आले. शुभम भोंडे हा 2020 मध्ये झालेल्या अनिकेत शिवाजी घाईतडक यांच्या खुनाच्या गुन्ह्यात जेलमध्ये होता. सध्या तो जामिनावर बाहेर आहे.

आरोपींनी त्याला रिक्षातून बाहेर ओढून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तू (Hadapsar) अनिकेतचा मर्डर केला आहे ना, आता बघ मर्डरला मर्डर रिप्लाय देणार, आज तुला कायमचे संपूनच टाकणार असे बोलून धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. यामध्ये शुभम भोंडे हा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Pune : ससून रुग्णालयात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारलेल्या विद्यार्थिनीचा अखेर मृत्यू; नैराश्यातून आत्महत्या

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.